coronavirus : परभणी जिल्ह्यात आणखी ७ कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या दिडशेच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 08:14 AM2020-07-06T08:14:01+5:302020-07-06T08:15:59+5:30
एकूण रुग्णासंख्या 149 वर पोहोचली आहे.
परभणी : जिल्ह्यात आणखी 7 कोरोनाबधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णासंख्या 149 वर पोहोचली आहे.
जिल्हा प्रशासनास रविवारी रात्री उशिरा नांदेड येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात 7 कोरोनासंशयितांचे स्वब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये परभणी शहरातील सरफराज नगर भागातील 28 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, झरी येथील 28 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, मानवत पोलीस वसाहत भागातील 55 वर्षीय पुरुष, गंगाखेड शहरातील पुजा मंगल कार्यालय येथील 60 वर्षीय पुरुष, तालुक्यातील शेलमोहा येथील 55 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 149 झाली आहे. त्यातील 98 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 4 जणांच्या मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.