CoronaVirus : प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या तलाठ्यावर पाथरीत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 06:21 PM2020-04-14T18:21:58+5:302020-04-14T18:24:05+5:30
हदगाव सज्जाचे तलाठी यांच्यावर महसूल विभागाची कारवाई
पाथरी - हदगाव सज्जा अंतर्गत काही नवीन नागरिक परजिल्ह्यातून आले असल्या बाबत सूचना मिळून ही या बाबत अवहाल सादर न करणे त्याच बरोबर मुख्यालयी हजर न राहणे वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणे आणि कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी तलाठी पी आर सावंत यांची एक वार्षिक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी व्ही एल कोळी यांनी काढले आहेत.
राज्यात कोरोना विषाणू मुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारातून आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्याने अधिसूचने ची अंमलबजावणी सध्या प्रश्सासकीय स्तरावर सुरू आहे , पर राज्यातून तसेच बाहेरील जिल्ह्यातील अनेक नागरिक पाथरी तालुक्यात दाखल होत आहेत , आपत्कालीन परिस्थितीत मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना मुख्यालयीराहून अवहाल सादर करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत ,तालुक्यातील हदगाव बु सज्जाचे तलाठी पी आर सावंत हे मुख्यालयी राहत नसल्याचे तसेच कार्यालय अंतर्गत मागविण्यात आलेली माहिती सादर करत नसल्याने आणि कऱयालाईन आदेशाची जाणून बुजून अवहेलना करत असल्याबाबत तसेच हदगाव बु सज्जा अंतर्गत नवीन नागरीक बाहेरून आल्या बाबत माहिती मिळून ही अवहाल सादर केला नसल्याचे तहसीलदार एन यु कागणे यांनी एक वेतन वाढ रोखण्याची शिफासर उपजिल्हाधिकारी यांच्या कडे अवहाल सादर करून केली होती , त्या नुसार तलाठी पी आर सावंत यांनी उपजिल्हाधिकारी व्ही एल कोळी यांनी कारवाई केली आहे , त्यांची एक वर्षाक वेतनवाढ तीन वर्षासाठी पुढील वेतनवाढीवर परिणाम न करता बंद ठेवण्याची शिक्षा देण्यात आली आहे , या कारवाई ने हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.