CoronaVirus : पाथरीकरांना दिलासा; दिल्लीवरून परतलेल्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 03:49 PM2020-04-05T15:49:47+5:302020-04-05T15:53:51+5:30
रुग्णास आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे
पाथरी : दिल्ली येथून 4 मार्च रोजी परतलेल्या एका व्यक्तीस प्रशासनाने पाथरी ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात निगराणीखाली ठेवले आहे. रविवारी सकाळी त्याचा स्वॅब चाचणी अवहाल निगेटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक डॉ सुमंत वाघ यांनी दिली. यामुळे पाथरीकरांना दिलासा मिळाला आहे.
दिल्ली येथील घटनेनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मागील काही महिन्यात विदेशवारी तसेच दिल्ली येथून परत आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. पाथरी शहरातील एक नागरिक 1 जानेवारी ते 4 मार्च या कालावधीत दिल्ली येथील एका कार्यक्रमातून परत आला होता. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवसांपूर्वी या रुग्णास पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर त्याचा स्वॅब घेऊन कोरोनाच्या तपासणी साठी पाठवण्यात आला होता. आज सकाळी कोरोनाच्या तपासणीचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला असल्याची माहिती वैधकीय अधीक्षक डॉ सुमंत वाघ यांनी दिली आहे. अवहाल निगेटिव्ह आला आहे त्या मुळे पाथरी नागरिकांनी आता घायबरून जाऊ नये, काळगी घावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान रुग्णाचा अवहाल निगेटिव्ह आला असला तरी 14 दिवस रुग्ण आयसोलेशन कक्षात ठेवले जाणार आहे , अशी माहिती देण्यात आली
नागरिकांनी काळजी घ्यावी
पाथरी येथील आयसोलेशन कक्षात ठेवलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली असली तरी बाहेरगावहुन येणाऱ्या रुग्णांना कोरोनाच्या विषाणूची लागण होत असल्याचे प्रकार उघड होत आहेत नागरिकानि सोशल डिस्टनसिंग पाळावी तसेच लॉक डाऊन च्या काळात घरात बसून राहावे , आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन वैधकीय अधीक्षक डॉ सुमंत वाघ यांनी केले आहे