CoronaVirus : कोरोना दक्षता ! परभणी जिल्ह्यातील ७१६ संशयित नागरिकांची तपासणी, ४१ जणांचे विलगिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 06:27 PM2020-04-29T18:27:02+5:302020-04-29T18:28:21+5:30

जिल्ह्यात प्रशासनाचा तपासणीवर भर

CoronaVirus: Corona efficiency! Investigation of 716 suspected citizens in Parbhani, isolation of 41 persons | CoronaVirus : कोरोना दक्षता ! परभणी जिल्ह्यातील ७१६ संशयित नागरिकांची तपासणी, ४१ जणांचे विलगिकरण

CoronaVirus : कोरोना दक्षता ! परभणी जिल्ह्यातील ७१६ संशयित नागरिकांची तपासणी, ४१ जणांचे विलगिकरण

Next

परभणी : परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आता संशयित नागरिकांच्या तपासणीवर भर दिला आहे. त्यातूनच जिल्ह्यात आतापर्यंत ७१६ संशयित नागरिकांची तपासणी केली असून, ४१ जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे़

पुणे येथून परभणीतील नातेवाईकांकडे आलेला हिंगोलीतील युवक कोरोनाग्रस्त झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात १४ दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले़ हा युवक आता कोरोनामुक्त झाला आहे़ त्यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला़ यापुढे जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळू नये, यासाठी आरोग्य प्रशासनाने संशयित नागरिकांची तपासणी करण्यावर भर दिला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत ७१६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे़ ६७४ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते़ त्यापैकी ६२३  जणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत़ सध्या ४१ जण रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात दाखल आहेत़ २७७ जणांचे विलगीकरण करण्यात आले असून, ३९८ जणांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे़ त्यामुळे नवीन संशित जिल्ह्यात दाखल होवू नयेत, याचीच काळजी प्रशासन घेत आहे़

Web Title: CoronaVirus: Corona efficiency! Investigation of 716 suspected citizens in Parbhani, isolation of 41 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.