coronavirus : पाथरीत एका अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित; पोलीस ठाणे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 03:30 PM2020-09-08T15:30:25+5:302020-09-08T15:31:03+5:30

पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

coronavirus: Coronavirus infected four policemen, including an officer in Pathari; Police Thane Seal | coronavirus : पाथरीत एका अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित; पोलीस ठाणे सील

coronavirus : पाथरीत एका अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित; पोलीस ठाणे सील

Next

पाथरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव  दिवसेंदिवस वाढत चालला आहे.  आता पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाथरी पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यानंतर तहसीलदार एस. बी. कट्टे यांनी पोलीस ठाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करत सील केले आहे. 

पाथरी तालुक्यातील मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. हा आकडा दीडशेच्या पुढे गेला आहे. कोरोनाचे लक्षण असलेले अनेक जण घरी औषध उपचार घेत आहेत. टेस्ट केल्या की रुग संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी पाथरी पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता चार पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यानंतर तहसीलदार एस. बी. कट्टे यांनी पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. 

Web Title: coronavirus: Coronavirus infected four policemen, including an officer in Pathari; Police Thane Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.