coronavirus : परभणीत ४ बाधितांचा मृत्यृ; एकूण कोरोनाबळींची संख्या ११५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 03:18 PM2020-08-28T15:18:12+5:302020-08-28T15:24:16+5:30
जिल्ह्यात २ हजार ६३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
परभणी: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४ कोरोनाबाधित व्यक्तींचा गुरूवारी रात्री व शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला असून जिल्ह्यात आता एकूण मयतांची संख्या ११५ झाली आहे.
जिंतूर येथील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने २५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरुअसताना या महिलेचा २७ आॅगस्ट रोजी रात्री १०.३६ च्या सुमारास मृत्यू झाला. तसेच परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट भागातील एका ६५ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याने २५ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३६ वाजता उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना या महिलेचा २७ आॅगस्ट रोजी मध्यरात्री १२.०५ च्या सुमारास मृत्यू झाला.
स्वॅब घेऊन वृद्धाचे घरीच केले होते विलगीकरण #coronavirushttps://t.co/GPBcafrGnk
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 27, 2020
मानवत शहरातील एकता नगर भागातील एका ७७ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाल्याने २७ आॅगस्ट रोजी रात्री ९.३३ वाजता उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना या व्यक्तीचा २८ आॅगस्ट रोजी सकाळी ७.२० च्या सुमारास मृत्यू झाला. तसेच पालम तालुक्यातील ताजवाडी येथील एका ५५ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाल्याने २६ आॅगस्ट रोजी रात्री १० वाजता परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना या पुरुषाचा २८ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास मृत्यू झाला. जिल्ह्यात आता एकूण मयतांची संख्या ११५ झाली असून २ हजार ६३१ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ९२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
#coronavirus#aurangabad सरकारी रुग्णालयातील खाटा रिक्तhttps://t.co/3SD6LD2D8x
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 27, 2020
इतर महत्वाच्या बातम्या :
- अंबाजोगाईत कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून
- बीड जिल्ह्यात ३० वर्षीय महिलेवर बलात्कार