Coronavirus : परभणीत मुंबईहून आलेली महिला कोरोनाबाधित, रुग्णसंख्या ५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 11:20 AM2020-05-17T11:20:43+5:302020-05-17T11:27:01+5:30
कोरोनाबाधित 50 वर्षीय महिला पाच दिवसांपूर्वी परभणीत आली आहे
परभणी: मुंबईतील गोरेगाव येथून नातेवाईकांसह 5 दिवसांपूर्वी आलेली एक 50 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. याबाबतचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
परभणी शहरातील मिलिंद नगर येथे 5 दिवसांपूर्वी मुंबईतील गोरेगाव येथून एका टेम्पोने एक महिला कुटुंबियांसह दाखल झाली. टेम्पोमध्ये 6 ते7 जण असल्याची माहिती मिळाली. या महिलेला त्रास होत असल्याने2 दिवसांपूर्वी ती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली होती. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून या महिलेचे स्वॅब घेऊन ते नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी सकाळी प्रशासणार प्राप्त झाला. त्यात सदरील महिला पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 5 कोरोना रुग्ण
आतापर्यंत जिल्ह्यात 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून चौघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एक जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाला आहे.