CoronaVirus : कौतुकास्पद ! सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करत पाथरीत गरीब कुटुंबांना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 02:14 PM2020-04-07T14:14:04+5:302020-04-07T14:50:19+5:30
12 दिवसात 2480 कुटुंबाला धान्य वाटप केले जाणार
- विठ्ठल भिसे
पाथरी : संचारबंदी च्या काळात गोरगरीब लोकांचे होणारे हाल आणि उपासमार टाळण्यासाठी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी पाथरी शहरात केलेल्या विशेष सर्वेक्षण मध्ये 2 हजार 480 कुटुंब पुढे आले आहेत. या कुटुंबातील लोकांना 15 दिवस पुरेल इतके धान्य 7 एप्रिल पासून वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. मोठया प्रमाणावर धान्य वाटपाचा कार्यक्रम होत असला तरी सोशल डिस्टनसिंगची काटेकोर अंमलबजावणी करत पहिल्या दिवशी 200 कुटुंबाला किट वाटप करण्यात आल्या आहेत.
पाथरी शहरात सध्या संचारबंदी सुरू आहे शहरात विविध वसाहती वर अनेक गोरगरीब मजूर लोक हाताला काम नाही त्या मूळ अन्न धान्य नसल्याने उपासमारीला सामोरे जात आहेत , शहरातील आशा लोकांचा शोध घेण्यासाठी आठ दिवसात एका संस्थेची मदत घेऊन आमदार बाबाजानी दुराणी यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत सर्वेक्षण केले आहे त्यात गोरगरीब आणि हातावर पोट असणारे 2 हजार 480 कुटुंबा सर्वेक्षनात दिसून आले आहेत या कुटुंबाला दर रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या किमान धान्याची किट देण्याचा निर्णय घेतला आमदार दुराणी यांनी स्वतः खर्चातून हे धान्य , 15 दिवस पुरेल एवढे धान्य या किट मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे ,
7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आमदार बाबाजानी यांच्या निवासस्थानासमोर किट वाटप करण्यात आल्या. यावेळी आमदार बाबाजानी दुर्रानी , तहसीलदार एन यु कागणे, नगर परिषद चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर आणि उपनगराध्यक्ष हनान खान यांची उपस्थिती होती. सोशल डिस्टनसिंग पाळून धान्य वाटपासाठी मोकळ्या जागेत 1 मीटर अंतराचे बॉक्स तयार करण्यात आले होते , गरजू लोकांना त्यांच्या तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधल्या नंतरच त्या ठिकाणी प्रवेश देऊन एक एक करत एक मीटर अंतरावर बसवण्यात आले , नंतर धान्याची एक किट त्यांच्या पर्यंत पोहचविण्यात आली. सोशल डिस्टनसिंगचे पालन करत धान्याचे किट वाटप करण्यात आले. 12 दिवस याच पद्धतीने सोशल डिस्टनसिंग ठेवत धान्य वाटप केले जाणार आहे.
काय आहे किट मध्ये
विविध 10 प्रकारच्या किराणा वस्तू देण्यात आल्या आहेत. यात 10 की गव्हाचे पीठ ,10 किलो तांदूळ ,2 की साखर ,2 तेल पुढे ,1 की मसूर डाळ , 250 ग्राम चहा पुडा, मिरची पावडर अंगाची साबण आणि कपड्याची साबण असे साहित्य या किटमध्ये वाटप करण्यात आले आहे.
गरजूपर्यंत छोटीशी मदत
दर वर्षी रमजानच्या काळात गोरगरीब लोकांना आवश्यक राशन पुरविण्यात येत असे, या वर्षी कोरोनाचे मोठे संकट आले आहे , गरीब लोकांची उपासमार होऊ नये यासाठी सर्व जमाजातील गरीब लोकांचे सर्वेक्षण करून त्याना दैनंदिन जीवनात लागणारे 15 दिवस पुरेल इतके धान्य किट देऊन छोटीशी मदत देण्याचा उपक्रम राबविण्यात आले आहे
- आमदार बाबाजानी दुर्रानी