CoronaVirus : दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी एकजण पाथरीच्या रुग्णालयात निगराणीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 06:37 PM2020-04-03T18:37:16+5:302020-04-03T18:38:58+5:30

स्वॅब नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवला

CoronaVirus: One involved in a religious event in Delhi is under the care of a Pathari hospital | CoronaVirus : दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी एकजण पाथरीच्या रुग्णालयात निगराणीखाली

CoronaVirus : दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी एकजण पाथरीच्या रुग्णालयात निगराणीखाली

Next

पाथरी : दिल्ली येथे धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्या एकास प्रशासनाने 2 एप्रिल रोजी रात्री उशिरा आरोग्य तपासणी करून होम कोरान्टीन केले होते. त्यानंतर आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने  पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात  त्याला दाखल केले.

पाथरी येथील मुस्लिम समाजातील एक जण धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने 1 जानेवारी ते 4 मार्च 2020 या काळात दिल्लीत वास्तव्यास होता. कोरोनाचा विषाणूचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार 3 एप्रिल रोजी त्या इसमास तहसील कार्यालयात बोलावून घेत कुटुंबातील सद्स्य यांची हिस्ट्री माहीत करून घेत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुमंत वाघ यांनी येथील ग्रामीण रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले आहे. तसेच त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे अशी माहिती डॉ सुमंत वाघ यांनी दिली.

Web Title: CoronaVirus: One involved in a religious event in Delhi is under the care of a Pathari hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.