CoronaVirus : परभणी जिल्ह्यातील आर्थिक उलढालीचे 'लॉक' उघडणार; कृषी, आरोग्यासह इतर व्यवसाय खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 08:18 PM2020-04-21T20:18:58+5:302020-04-21T20:20:54+5:30
बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल सुरु होण्याची शक्यता
परभणी: जिल्ह्यातील कृषी, कृषी क्षेत्रावर आधारित इतर व्यवसाय, आरोग्य क्षेत्रातील व्यवसाय आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील व्यवसाय सुरु करण्याची मुभा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर मंगळवारी विविध आदेशान्वये दिली असून त्यामुळे एक महिन्यापासून ठप्प असलेली जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे मागील महिनाभरापासून कृषी क्षेत्रातील बाजारपेठही ठप्प पडली होती. शेतमाल उपलब्ध असतानाही तो विक्री करता आला नाही.
शिवाय शेतीच्या कामांनाही फटका बसला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी २१ एप्रिल रोजी एक आदेश जारी केला असून त्यात परभणी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्र, कृषी विषयी साहित्य, साधान सामुग्रीची दुकाने, बीज प्रक्रिया केंद्र, बीज तपासणी प्रयोगशाळा, कृषी विषयक उत्पादने, कृषी सेवा पुरविणाºया अस्थापना, कृषी साहित्य दुरुस्त करणाºया अस्थापना, बोअरवेल मशीन पूर्ववत सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या निर्देशांचे पालन करीत कृषी अस्थापना सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या काळात सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करावे, आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून मजूर आणण्यास प्रतिबंध केला आहे. जिल्ह्यातील कृषी विषयक अस्थापना सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिल्याने या क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बुधवारपासून कृषी बाजारपेठेत चहलपहल वाढण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे आयुष योजनांच्या समावेशासह सर्व आरोग्य सेवा सुरु करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. त्यामध्ये दवाखाने, सुश्रूशागृह, चिकित्सालय, टेलि मेडिसीन सुविधा, औषधालय, औषध निर्माण केंद्र, वैद्यकीय उपकरणांची दुकाने, वैद्यकीय प्रयोगशाळा आणि संग्रह केंद्र, कोविड १९ च्या संबंधाने संशोधन करणारे औषध निर्माण केंद्र आणि वैद्यकीय संशोधन प्रयोगशाळा, पशूवैद्यकीय दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, कोविड १९ चे प्रतिबंध संबंधाने कार्य करणा-या मान्यता प्राप्त खाजगी संस्था, होमकेअर सेवा पुरविणाऱ्या संस्था, रोग निदान संस्था आदी सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील सेवाही सुरु करण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले. त्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा, त्यामध्ये ५० टक्के कर्मचारी कार्यरत असावेत, ई- कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने, आवश्यक त्या परवानगीसह सुरु ठेवता येतील. ज्यामध्ये अन्नऔषध, वैद्यकीय उपकरणे, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे या सारख्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवेचा पुरवठा यांचा समावेश आहे.
रमजान महिन्यात घरातच धार्मिक कार्य पार पाडावे
मुस्लिम समाज बांधवांना पवित्र रमजान महिना सुरु होत असून या महिन्यात सार्वजनिक नमाज अदा करण्याची प्रथा आहे. सद्यस्थिती विचारात घेता अधिक संख्येने नागरिक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने मुस्लिम समाज बांधवांनी लॉकडाऊनच्या काळात एकत्र न येता आपापल्या घरातच धार्मिक कार्य पार पाडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना या विषाणूमुळे पसरत असलेला आजार संसर्गजन्य म्हणून घोषित केला आहे. नुकताच परभणी शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून पवित्र रमजान महिन्यात मुुस्लिम समाजातील नागरिक नमाजसाठी एकत्र येत असतात. त्यामुळे सद्यस्थिती लक्षात घेता कोरोना प्रसार रोखण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी आपापल्या घरातच नमाज अदा करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.