coronavirus : रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये परभणी जिल्ह्यात आढळले १८१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 04:36 PM2020-08-18T16:36:56+5:302020-08-18T16:40:24+5:30
अँटीजन कीटद्वारे तपासणीमुळे रुग्णांची संख्या झटपट निष्पन्न
परभणी : जिल्ह्यात रॅपिड टेस्टची संख्या वाढविण्यात आली आहे़ सोमवारी जिल्हाभरात झालेल्या ठिक ठिकाणच्या तपासण्यांमध्ये एकूण १८१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत़ परभणी शहरात महानगरपालिकेने १४ केंद्रांवर १ हजार ३२५ व्यापाऱ्यांची रॅपिड टेस्ट केली़ त्यामध्ये ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़
पाथरी शहरात ३०१ जणांच्या टेस्ट घेतल्या असून, त्यात ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये नगरपालिकेच्या ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़ पालम शहरासह दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेल्या रॅपिड तपासणीत ६ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत़ त्यांना पेठशिवणी येथील कोविड सेंटर येथे दाखल केले आहे़ लोहा रस्त्यावरील आश्रम शाळेत ५० जणांपैकी दोघे आणि चाटोरी येथील आरोग्य केंद्रात ५० पैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़
गंगाखेड शहरात ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यातील ५ जण ग्रामीण भागातील आहेत़ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने शहरातील ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले़ तालुक्यात आता बाधित रुग्णांची संख्या २६७ पेक्षाही अधिक झाली आहे़
पूर्णा शहरात दिवसभरात ११० जणांची तपासणी करण्यात आली़ त्यात ६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत़ धानोरा काळे येथेही २२ जणांची तपासणी करण्यात आली़ त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़
ग्रामीण भागात एकाच दिवशी १०० रुग्ण
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सोमवारपासून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट सुरू केल्या आहेत़ सोमवारी दिवसभरात १०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत़ जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी रॅपिड टेस्ट केली जात आहे़ परभणी तालुक्यात १४२ जणांची तपासणी करण्यात आली़ त्यात चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ गंगाखेड तालुक्यात १२७ जणांची तपासणी करण्यात आली़ त्यात ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले़ पाथरी तालुक्यात ६७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली़ त्यात ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले़ सेलू तालुक्यात १६९ पैकी १, मानवत तालुक्यात ६२ पैकी १, जिंतूर तालुक्यात १०९ पैकी २, पूर्णा तालुक्यात २६६ पैकी ३७, सोनपेठ तालुक्यात २३ पैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत तर पालम तालुक्यामध्ये ३० जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली़ त्यात एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही़ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोमवारी दिवसभरात १ हजार ६०५ तपासण्या करण्यात आल्या़ त्यात १०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागातही विळखा वाढत आहे़
जिंतूरमध्ये ६ व्यापारी पॉझिटिव्ह
शहरात व्यापाऱ्यांच्या रॅपिड टेस्ट केल्या जात आहेत़ सोमवारी ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ १५ आॅगस्टपासून रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात आली़ पहिल्या दिवशी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ २० व्यापारी पॉझिटिव्ह आढळले़ १७ आॅगस्ट रोजी आरोग्य विभागाने ५८ जणांची रॅपिड टेस्ट केली़ त्यात ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ शहरात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ होत आहे़