CoronaVirus : परभणीकरांना दिलासा ! पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा स्वॅब अहवाल आला निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 07:32 PM2020-04-25T19:32:14+5:302020-04-25T19:33:06+5:30

तरुणाच्या संपर्कात आलेल्या ९ नातेवाईक आणि अन्य १९ अशा २८ जणांचेही स्वॅब घेण्यात आले होते़ या सर्व २८ जणांचे स्वॅब अहवाल दुसऱ्यांदाही निगेटिव्ह आले.

CoronaVirus: Relief to Parbhanikars! The second swab report of a positive patient was negative | CoronaVirus : परभणीकरांना दिलासा ! पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा स्वॅब अहवाल आला निगेटिव्ह

CoronaVirus : परभणीकरांना दिलासा ! पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा स्वॅब अहवाल आला निगेटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णाचा पुढील २४ तासात तिसऱ्यांदा स्वॅब घेणार

परभणी :  शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे़ आता २४ तासानंतर रविवारी तिसरा स्वॅब या तरुणाचा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली़

हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण १३ एप्रिल रोजी पुण्याहून दुचाकीने परभणीतील एमआयडीसी भागात नातेवाईकांकडेआला होता़ या तरुणाची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता़ त्यामुळे परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच या तरुणाच्या निमित्ताने कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले़ त्यानंतर या तरुणाच्या संपर्कात आलेल्या ९ नातेवाईक आणि अन्य १९ अशा २८ जणांचेही स्वॅब घेण्यात आले होते़ या सर्व २८ जणांचे स्वॅब अहवाल दुसऱ्यांदाही निगेटिव्ह आले़ त्यानंतर शनिवारी सायंकाळी कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या स्वॅबचा दुसरा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला़ त्यामध्ये सदरील स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली़ आता २४ तासानंतर म्हणजेच रविवारी तिसरा स्वॅब या तरुणाचा घेतला जाणार आहे़

Web Title: CoronaVirus: Relief to Parbhanikars! The second swab report of a positive patient was negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.