coronavirus : धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात कोरोनामुळे ९ तासांत चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 09:29 AM2020-08-12T09:29:00+5:302020-08-12T09:31:13+5:30
जिल्ह्यात आता एकूण मयतांची संख्या ६१ झाली आहे. झाली आहे.
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४ कोरोनाबाधित रुग्णांचा ९ तासांत मृत्यू झाल्याने बुधवारची सकाळ परभणीकरांसाठी धक्कादायक ठरली आहे.
परभणी शहरातील विद्या नगर भागातील ६५ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाल्याने मंगळवारी दुपारी १ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या व्यक्तीचा रात्री ९.४१ वाजता मृत्यू झाला. तसेच कालाबावर भागातील ६५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याने १० ऑगस्ट रोजी रात्री ९.०५ वाजता जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीचा मंगळवारी रात्री १०.५५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शहरातील हर्ष नगर भागातील ५५ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याने १० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या महिलेचा बुधवारी सकाळी ५.५६ वाजता मृत्यू झाला. शहरातील वड गल्ली येथील ५९ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याने ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.५० वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या व्यक्तीचा बुधवारी सकाळी ५.३० वाजता मृत्यू झाला.
जिल्ह्यात आता एकूण मयतांची संख्या ६१ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार १९६ झाली आहे. त्यात ४८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.