coronavirus परभणीत कडक निर्बंध; जिल्ह्यात १० मेपर्यंत किराणा दुकाने, बाजार राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 05:49 PM2021-05-04T17:49:35+5:302021-05-04T17:50:16+5:30

नागरिकांच्या सुविधेसाठी १ ते ४ मे दरम्यान किराणा दुकाने आणि भाजीपाला बाजार सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा दिली होती.

coronavirus : Strict restrictions in Parabhani; Grocery shops and markets closed in the district till May 10 | coronavirus परभणीत कडक निर्बंध; जिल्ह्यात १० मेपर्यंत किराणा दुकाने, बाजार राहणार बंद

coronavirus परभणीत कडक निर्बंध; जिल्ह्यात १० मेपर्यंत किराणा दुकाने, बाजार राहणार बंद

Next

परभणी : जिल्ह्यातील किराणा दुकाने, भाजीपाला बाजार व इतर खाद्यपदार्थांची दुकाने १० मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात १५ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदी काळात नागरिकांच्या सुविधेसाठी १ ते ४ मे दरम्यान किराणा दुकाने आणि भाजीपाला बाजार सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. या संदर्भाने मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील किराणा साहित्याची दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची दुकाने ४ ते १० मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय सेवा व साहाय्यभूत सेवांना या आदेशावरून वगळण्यात आले आहे.
 

Web Title: coronavirus : Strict restrictions in Parabhani; Grocery shops and markets closed in the district till May 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.