coronavirus : कोरोना बाधितांच्या संपर्कातील दहा जण आयसोलेशन कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 06:28 PM2020-05-15T18:28:01+5:302020-05-15T18:29:48+5:30
तीन कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात असलेल्या दहा जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
परभणी : जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील तिघांचे स्वॅब अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई येथून परतलेल्या जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एक महिला आणि दोन मुलांचा स्वॅब अहवाल गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यानंतर या तीन कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात असलेल्या दहा जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
दरम्यान, गुरुवारी प्रलंबित असलेल्या ३८ स्वॅब अहवालापैकी केवळ तीन स्वॅब अहवाल रात्री प्राप्त झाले. शुक्रवारी दिवसभरात एकही अहवाल प्राप्त झाला नाही. शुक्रवारी दिवसभरात १९ नवीन रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात ५९ संशयित नागरिक उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.