जल पुनर्भरणाचा केलेला खर्च गेला वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:47+5:302021-06-16T04:24:47+5:30

शहराची लाेकसंख्या ३,२१,००० शहरातील मालमत्ता ७४,००० ओपन स्पेसवरील जलपुनर्भरण १०६ घरोघरी केलेले जलपुनर्भरण अंदाजे २००० कर सवलतीपासून अनेक जण ...

The cost of water recharge was wasted | जल पुनर्भरणाचा केलेला खर्च गेला वाया

जल पुनर्भरणाचा केलेला खर्च गेला वाया

Next

शहराची लाेकसंख्या

३,२१,०००

शहरातील मालमत्ता

७४,०००

ओपन स्पेसवरील जलपुनर्भरण

१०६

घरोघरी केलेले जलपुनर्भरण

अंदाजे २०००

कर सवलतीपासून अनेक जण वंचित

जलपुनर्भरणाचा प्रयोग घरोघरी करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालमत्ता करामध्ये ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यानंतर काही जणांनी जलपुनर्भरण केले. तसेच महापालिकेकडे अर्जही सादर केले. परंतु, यातील अनेकांना ही सवलत दिली नसल्याचे काही जणांनी बोलून दाखवले. यामुळे नागरिक या योजनेपासून वंचित राहिल्याचे दिसून येते. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना त्यावेळी तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांनी त्यांच्या स्वत:च्या घरी जलपुनर्भरण करण्याचे आदेश काढले होते. यातील काही जणांनी पगार थकेल, या भीतीपोटी काम केले, तर काहींनी या नियमाला बगल दिली.

महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज

शहरातील मालमत्तांची संख्या जवळपास ७४ हजार आहे. त्यापैकी ३ टक्के नागरिकांनी जलपुनर्भरण केले आहे. यामुळे उर्वरित मालमत्ताधारकांनी जलपुनर्भरण करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.

माझ्या प्रभागातील ८ ते १० ठिकाणी हे काम २०१७ - १८मध्ये पूर्ण करण्यात आले होते. मात्र, यानंतर या मोहिमेकडे प्रशासनासह नागरिकांनी दुर्लक्ष केले. सध्या नागरिकांना जलपुनर्भरण करण्यासाठी कर सवलतीचा लाभ दिल्यास ही संख्या वाढेल.

-सचिन देशमुख, नगरसेवक

Web Title: The cost of water recharge was wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.