क्षतीग्रस्त प्रकल्पांचा अहवाल तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:31+5:302021-09-25T04:17:31+5:30

परभणी : मराठवाड्यात यावर्षी कधी नव्हे एवढा पाऊस झाला असून, या पावसाने प्रकल्पांच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. तेव्हा क्षतीग्रस्त ...

Create a report of damaged projects | क्षतीग्रस्त प्रकल्पांचा अहवाल तयार करा

क्षतीग्रस्त प्रकल्पांचा अहवाल तयार करा

Next

परभणी : मराठवाड्यात यावर्षी कधी नव्हे एवढा पाऊस झाला असून, या पावसाने प्रकल्पांच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. तेव्हा क्षतीग्रस्त प्रकल्पांच्या सुधारणांसाठी चौकशी अहवाल तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक जयंत मीना, सहायक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांची उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले, यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पांच्या क्षमता उघड्या पडल्या आहेत. मात्र ही स्थिती नैसर्गिक आहे. पूर्णा प्रकल्प १०० टक्के भरल्याने अतिरिक्त पाणी वाहून जात आहे. हे थांबविण्यासाठी आणि जिल्ह्यातील सिंचन वाढविण्यासाठी पूर्णा नदीवर ममदापूर, जोडपरळी, पोटा, पिंपळगाव कुटे या ठिकाणी चार बंधाऱ्यांना मंजुरी दिली आहे. जमिनींच्या किमती वाढल्याने प्रकल्पांच्या सुधारणांसाठी अडचणी येत आहेत. निम्न दुधना प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांसाठी सुधारित अहवाल तयार करून प्रशासकीय मान्यता घेतली जाईल. जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यांची मोठी हानी झाली आहे. त्यासाठी एजन्सी नेमून लवकरच आधुनिकीकरण अहवाल तयार करून जागतिक बँकेच्या मदतीने कामे केली जातील, असे पाटील यांनी सांगितले.

राज्यातील महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी एकत्रित लढवाव्यात, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे, असे पाटील म्हणाले. संयुक्त किसान मोर्चाने २७ सप्टेंबर रोजी बंदची हाक दिली असून, या बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Create a report of damaged projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.