वीज कर्मचाºयास शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:26 AM2018-01-22T00:26:37+5:302018-01-22T00:27:14+5:30
तालुक्यातील नांदापूर गावाची लाईट का बंद केली अशी विचारणा करून कर्मचाºयास शिवीगाळ केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला करण्यात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील नांदापूर गावाची लाईट का बंद केली अशी विचारणा करून कर्मचाºयास शिवीगाळ केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला करण्यात आहे़
२० जानेवारी रोजी नांदापूर या गावाचा वीज पुरवठा खंडीत झाला होता़ त्यानंतर काही युवकांनी झरी येथील वीज वितरण केंद्रात जाऊन वीज पुरवठा का बंद झाला, अशी विचारणा केली़
या प्रकारानंतर वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सुदाम धडसे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे़ त्यांच्या तक्रारीनुसार गंगाधर जवंजाळ, बाळू रसाळ, लक्ष्मण रसाळ व अन्य एकाने झरी येथील वीज उपकेंद्रात येऊन गावाची लाईट बंद का केली या कारणावरून उपकेंद्रात उपस्थित असलेल्या कर्मचाºयास शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्कीही केली़ धडसे यांच्या तक्रारीवरून चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़