फसवणूक प्रकरणातील ४ आरोपींची कोठडी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:07+5:302021-01-02T04:15:07+5:30
मुंबई येथील डाॅ. उज्ज्वला बोराडे यांना सुनीता भोसले हिने ३० हजार रुपये प्रति तोळा सोने देते म्हणून २५ डिसेंबर ...
मुंबई येथील डाॅ. उज्ज्वला बोराडे यांना सुनीता भोसले हिने ३० हजार रुपये प्रति तोळा सोने देते म्हणून २५ डिसेंबर रोजी सेलू येथे बोलावून घेतले. त्यानंतर एका शेतात नेऊन मारहाण करीत रोख ८ लाख रुपये, मोबाईल असा ८ लाख २१ हजार रूपयाचा ऐवज २५ डिसेंबर रोजी लुटला होता. या प्रकरणी सविता भोसले सह ८ आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सेलू पोलिसांच्या पथकाने जवळा जिवाजी येथून सुनीता भोसले आणि मंजिरी सुखवास शिंदे या दोन महिलांना तर सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथून शैलेश शिंदे, श्रीनाथ भोसले यांना रविवारी पहाटे ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख ५ लाख ५ हजार रुपये हस्तगत केले होते. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या ४ आरोपींना न्यायालयाने १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सेलू पोलिसांनी शुक्रवारी चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत ३ जानेवारीपर्यंत वाढ करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.