हरभऱ्याच्या पिकाला घाटेअळीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:26+5:302020-12-23T04:14:26+5:30

भाजीपालावर्गीय पिकांमध्येही अळीचा प्रादुर्भाव आढळत आहे. या अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी पायरीप्रॉक्सीफेन १० टक्के ईसी ४ मिली किंवा फेनप्रोपाथ्रीन ...

Danger to gram crop | हरभऱ्याच्या पिकाला घाटेअळीचा धोका

हरभऱ्याच्या पिकाला घाटेअळीचा धोका

Next

भाजीपालावर्गीय पिकांमध्येही अळीचा प्रादुर्भाव आढळत आहे. या अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी पायरीप्रॉक्सीफेन १० टक्के ईसी ४ मिली किंवा फेनप्रोपाथ्रीन १० टक्के ईसी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कांदा पिकात करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास डायफेन्कोनॅलोझ २५ टक्के ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात स्टीकरसह मिसळून फवारणी करावी, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी दिला आहे.

पशुधनासाठी उपाययोजना करा

जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे. या गारव्याचा पशुधनालाही धोका निर्माण होऊ शकतो. थंडीपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी शेळ्या, मेंढ्या तसेच कोंबड्यांच्या शेडला बारदाण्यांचे पडदे लावावेत, त्याचप्रमाणे कोंबड्यांच्या शेडमध्ये विद्युत बल्ब लावल्याने थंडीपासून त्यांचे संरक्षण होण्यास मदत होईल, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

Web Title: Danger to gram crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.