जीपच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

By Admin | Published: January 9, 2017 04:17 AM2017-01-09T04:17:28+5:302017-01-09T04:17:28+5:30

टाटा सुमोची धडक बसून झालेल्या अपघातात सहा वर्षीय बालिका ठार झाली. तर एका बालकासह महिला जखमी

The death of the baby in the jeep | जीपच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

जीपच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

googlenewsNext

परभणी : टाटा सुमोची धडक बसून झालेल्या अपघातात सहा वर्षीय बालिका ठार झाली. तर एका बालकासह महिला जखमी झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास पूर्णा येथील जि.प. शाळेच्या मैदानावर घडली.
हिंगोलीतील फुलेनगर परिसरात राहणाऱ्या मीना बंडू थोरात, त्यांचा मुलगा करण थोरात (वय ७) व भावाची मुलगी अर्चना रामा गायकवाड (वय ६) हे तिघेजण ७ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या सुमारास गावात काम करणाऱ्या भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी जात होते. त्यांना एम.एच.२३-ई-२९७८ या क्रमांकाच्या जीपने धडक दिली. यात सहा वर्षीय अर्चना रामा गायकवाड या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर मीना थोरात व करण थोरात हे दोघे जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the baby in the jeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.