बैलाच्या धडकेने विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 05:53 PM2019-01-31T17:53:52+5:302019-01-31T17:57:24+5:30
पाणी पाजण्यासाठी विहिरीवर नेलेल्या बैलाने अचानक धडक मारल्याने शेतकरी विहिरीत पडले
चारठाणा (परभणी) : पाणी पाजण्यासाठी विहिरीवर नेलेल्या बैलाने अचानक धडक मारल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरी गिते येथे २९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली.
चारठाणा गावापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या पिंपरी गिते येथील अर्जून नागोराव गिते (५५) हे २९ जानेवारी रोजी शेतातील कामकाज आटोपून बैलांना पाणी पाजण्यासाठी विहिरीजवळ घेऊन आले. यावेळी एका बैलाने त्यांना अचानक धडक दिली. यात ते विहिरीत पडले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या शेताच्या शेजारी असलेल्या शेतात काम करणाऱ्या एका महिलेला ही घटना निदर्शनास आली. तिने ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी गिते यांना विहिरीतून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती समजताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर घोळवे, डी.एस. जानकर, बीटजमादार गुलाब भिसे , गजभारे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी चारठाणा पोलोस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.