मृत्यू हरला, गोलू जिंकला... ७ तासानंतर २५० फूट बोअरवेलमधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 09:10 AM2023-08-10T09:10:41+5:302023-08-10T09:10:54+5:30

माय... पोर वाचू दे गं... म्हणत अख्खं गाव जमलं शिवारात

Death lost, golu won... boy fell 250 feet borewell out after 7 hours | मृत्यू हरला, गोलू जिंकला... ७ तासानंतर २५० फूट बोअरवेलमधून बाहेर

मृत्यू हरला, गोलू जिंकला... ७ तासानंतर २५० फूट बोअरवेलमधून बाहेर

googlenewsNext

- सत्यशील धबडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (जि. परभणी) : शेतात खेळता-खेळता पाच वर्षांचा चिमुकला २५० फूट उघड्या बोअरवेलमध्ये पडला. तो १८ फुटांवर अडकला अन् सुरू झाला मृत्यूसोबतचा थरारक संघर्ष. सात तासांच्या परिश्रमानंतर ‘एसडीआरएफ’च्या पथकाने त्याला बाहेर काढले. मृत्यूला हरवून बाहेर आलेल्या या चिमुकल्याला आजी-आजोबांनी काळजाशी धरलं अन् ग्रामस्थांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. उक्कलगाव शिवार (ता. मानवत) येथे बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेतून गोलू सुरेश उक्कलकर हा सुखरूप वाचला.

११२ वर कॉल
गोलू शेतात उघड्या बोअरवेलमध्ये पडल्याची माहिती ग्रामस्थांनी ११२ क्रमांकावर कॉल करून दिल्यानंतर अधिकारी घटनास्थळी आले.
असा झाला थरार
दुपारी १२:०० च्या सुमारास गोलू बोअरवेलमध्ये पडला.
दुपारी २:०० ला जेसीबीने खड्डा करून बचावकार्याला सुरुवात.
सायंकाळी ७.१० ला चिमुकल्याला बाहेर काढण्यात यश आले.

‘मला लवकर बाहेर काढा’
आत पडलेला गोलूशी दुपारी 
एकपासून संवाद साधला जात होता. ‘दादा मला लवकर बाहेर काढा,’ अशी हाक तो आजोबांना देत होता. त्याला ऑक्सिजनची कमतरता कमी पडू नये म्हणून ग्रामीण आणि खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले होते.

आईची पुण्यात घालमेल
गोलूची आई पुण्यात आहे. इकडे गोलूचा संघर्ष तिकडे आईची घालमेल ही अवस्था अनेकांच्या मनाला चटका लावत होती. काळजाचा तुकडा धोक्यात असल्याने आईचे डोळे आणि कान उक्कलगावकडे लागले होते. गोलूला सात तासानंतर सुखरूप बाहेर काढल्याचे ऐकताच आईचा जीव भांड्यात पडला.

Web Title: Death lost, golu won... boy fell 250 feet borewell out after 7 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.