कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:21+5:302021-06-23T04:13:21+5:30
मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे नागरिकांत समाधान असले तरीही दररोज बाधित रुग्णांचे मृत्यू होत ...
मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे नागरिकांत समाधान असले तरीही दररोज बाधित रुग्णांचे मृत्यू होत असल्याने चिंता निर्माण झाली होती. तब्बल दोन महिन्यांपासून दररोज कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत होते. मंगळवारी हे मृत्यू थांबले आहेत. दिवसभरात एकाही बाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही.
आरोग्य विभागाला २ हजार ७४५ नागरिकांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. त्यात २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आरटीपीसीआरच्या २ हजार ५२९ अहवालांमध्ये १६ आणि रॅपिड टेस्टच्या २१६ अहवालांमध्ये ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, नागरिकांना आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकूण ५० हजार ६५३ रुग्ण नोंद झाले. त्यापैकी ४९ हजार १२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात १ हजार २७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५१ रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात ३३ रुग्णांना सुटी देण्यात आली.