खुपसा ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:30+5:302020-12-23T04:14:30+5:30

सेलू - देवगावफाटा रस्त्यावर खुपसा हे ७०० लोकसंख्या असलेले गाव आहे. येथे ग्रामपंचायतीचे तीन प्रभाग असून सदस्य ...

Decision to make Khupsa Gram Panchayat unopposed | खुपसा ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय

खुपसा ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय

googlenewsNext

सेलू - देवगावफाटा रस्त्यावर खुपसा हे ७०० लोकसंख्या असलेले गाव आहे. येथे ग्रामपंचायतीचे तीन प्रभाग असून सदस्य संख्या ७ असून ४७५मतदार आहेत. येथील ग्रामस्थांची सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेअंती गावाच्या विकासासाठी यावेळीही बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र डासाळकर, अजय डासाळकर, मधुकरराव डासाळकर, ज्ञानेश्वर डासाळकर, गुलाबराव डासाळकर, बाबासाहेब डासाळकर, तुकाराम डासाळकर, मोहनराव डासाळकर, भानुदास डासाळकर, आन्नासाहेब वाघ, प्रल्हाद चव्हाण, सोपान चव्हाण, जनार्दन गायकवाड आदी उपस्थित होते.

खुपसा येथील ग्रामस्थांनी मागील दहा वर्षांपासून निवडणूक बिनविरोध करण्याची सुरु केलेली परंपरा कायम राखली आहे. बिनविरोध निवडणूकीमुळे गावाचा सामाजिक सलोखा आणि विकास साध्य होत असल्याचे बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र डासाळकर यांनी सांगितले.

Web Title: Decision to make Khupsa Gram Panchayat unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.