चुडावा मंडळात दुष्काळ घोषीत करा; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:52 PM2018-11-15T16:52:18+5:302018-11-15T16:53:19+5:30
चुडावा महसूल मंडळात खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले असून हे मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पूर्णा(परभणी) : चुडावा महसूल मंडळात खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले असून हे मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मंडळातील दहा गावच्या शेतकऱ्यांनी या मागणीचे एक निवेदन आज दुपारी तहसीलदार श्याम मंदणुरकर यांना सादर केले.
चुडावा महसूल मंडळामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन, मुग, उडीदाचे उत्पादन घटले आहे.खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. यामुळे मंडळात तत्काळ दुष्काळ घोषित करुन पीक विमा देण्यात यावे, तसेच दुष्काळ काळातील इतर सुविधा द्याव्यात या मागणीसाठी चुडावा मंडळातील धानोरा मोत्या,सोनखेड,हिवरा,भाटेगाव,गौर,न-हापूर,आडगाव गावच्या शंभरावर शेतकऱ्यांनी आज दुपारी तहसीलदार श्याम मंदणुरकर यांची भेट घेतली.
यावेळी तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर रावण मोहिते, रामप्रसाद देसाई,गोपाळ देसाई,ज्ञानेश्वर देसाई,चंद्रकांत क-हाळे , विनायक देसाई, गजानन देसाई,मारोती देसाई, भगवान देसाई,नितीन देसाई, रोहिदास देसाई,किशन चव्हाण,काशिनाथ क-हाळे,उध्वव क-हाळे,दता क-हाळे,प्रेम देसाई,लक्ष्मण देसाई,मधूकर खंदारे, बालाजी देसाई,ग्यानू देसाई,नेमाजी देसाई, माणिकराव वाघ,लिंबाजी डाखोरे,गणपती मोहिते, नागोराव वाघ,व्यंकटी हतागळे,विठ्ठल देसाई आदींच्या स्वाक्ष-या आहेत.