गावात विकासकामे होत नसल्याचा आरोप करत देऊळगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 17:36 IST2018-01-30T17:36:00+5:302018-01-30T17:36:24+5:30
सेलु ( परभणी ) : वारंवार मागणीकरूनसुद्धा गावात विकासकामे होत नसल्याने देऊळगाव (गात) येथील ग्रामस्थांनी आज सकाळी 10 वाजेच्या ...

गावात विकासकामे होत नसल्याचा आरोप करत देऊळगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले कुलूप
सेलु (परभणी) : वारंवार मागणीकरूनसुद्धा गावात विकासकामे होत नसल्याने देऊळगाव (गात) येथील ग्रामस्थांनी आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप ठोकले.
देऊळगाव गात ग्रामपंचायत लोकसंख्येच्या दृष्टीने तालुक्यात दुस-या क्रमांकावर आहे. या गावची लोकसंख्या जवळपास 8 हजार एवढी आहे .ग्रामपंचायतीला एक वर्षापुर्वी विकासासाठी 25 लक्ष रुपयाचा निधी मिळाला आहे. मात्र अद्यापही या निधीतुन विकास कामे करण्यात आली नाहीत. ग्राम पंचायतीच्या वार्ड क्र. 3 मध्ये रस्ता नसुन पथदिवे सुद्धा लावण्यात आले नाहीत असा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप ठोकले या अंदोलनात शिवराम कदम, कल्याण कदम, बाळासाहेब कदम, विठ्ठल कदम, रघुनाथ कदम, प्रताप कदम, भगवान काळे, रामा कदम, डिगांबर कदम, यांचा सहभाग होता.
दरम्यान, विकासनिधी प्राप्त झाला असला तरी जिएसटी मुळे विकास कामाचे अंदाजपत्रक आणि तांत्रीक बाबी पुर्ण करण्यासाठी वेळ लागला. लवकरच उपलब्ध निधीतुन विकास कामे करण्यात येतील अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कदम यांनी दिली.