जिल्ह्यात रक्तपिशव्यांची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:40+5:302021-08-29T04:19:40+5:30
परभणी जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रोल ब्लड बँकेमध्ये सध्या वेगवेगळ्या रक्त गटांच्या १५० पिशव्या शिल्लक आहेत. मागील आठ ते दहा दिवसांपासून ...
परभणी जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रोल ब्लड बँकेमध्ये सध्या वेगवेगळ्या रक्त गटांच्या १५० पिशव्या शिल्लक आहेत. मागील आठ ते दहा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात नवीन रक्तदानाचे कार्यक्रम बंद आहेत. यामुळे रक्तपिशव्यांच्या संकलनावर परिणाम झाला आहे. दररोज दिवसभरात २० ते २५ जण गरजेेप्रमाणे बोलावून त्यांच्याकडून रक्तदान करून घेतले जाते. मात्र ही संख्या वाढण्याची गरज आहे. आगामी काळातील सण, उत्सव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यास रक्तदान शिबिर होऊ शकतात. यातून मोठा साठा निर्माण होऊ शकतो. मात्र सध्या तरी दात्यांची गरज निर्माण झाली आहे.
बी पॉझिटिव्हचा साठा कमी
विविध रक्तगटांतील बी पॉझिटिव्ह या गटासाठीचे रक्तसंकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे या रक्तगटाचे दाते शोधावे लागत आहेत. उर्वरित थॅलेसेमिया, अपघात व अन्य रुग्णांना लागणारे रक्ताचे प्रमाण सर्वाधिक आहे.