कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:50+5:302021-04-09T04:17:50+5:30

दादऱ्याच्या कामाला मिळेना गती परभणी : येथील रेल्वेस्थानकावरील दादऱ्याचे काम संथगतीने सुरू आहे. वर्षभरापूर्वी या कामाला सुरुवात करण्यात आली. ...

Demand for canal repair | कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी

कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी

Next

दादऱ्याच्या कामाला मिळेना गती

परभणी : येथील रेल्वेस्थानकावरील दादऱ्याचे काम संथगतीने सुरू आहे. वर्षभरापूर्वी या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्रवाशांना अधिक रुंदीच्या दादऱ्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या रेल्वे प्रवासी वाहतूक मर्यादित स्वरुपाची आहे. ही बाब लक्षात घेता, दादऱ्याचे काम त्वरित पूर्ण करून घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

सिमेंट रस्त्याला मधोमध भेगा

परभणी : पारदेश्वर मंदिरापासून पॉवर हाऊसकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याला मधोमध भेगा पडल्या असून, या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. रस्त्याच्या मधोमध भेगा असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

घरकुलांसाठी मिळेना प्रशासनाकडून वाळू

परभणी : घरकुल बांधकामासाठी प्रशासनाने वाळू उपलब्ध करून द्यावी, असे आदेश असताना स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे घरकुल बांधकामे ठप्प आहेत.

Web Title: Demand for canal repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.