रमजान महिन्यात सवलत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:28 AM2021-05-05T04:28:09+5:302021-05-05T04:28:09+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १ ते ४ मे ...
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १ ते ४ मे या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी सूट दिली होती. त्याची मुदत मंगळवारी संपली आहे. रमजान महिन्याचे आणखी १० दिवस शिल्लक आहेत. या काळात मुस्लीम बांधवांना ईदनिमित्त खरेदी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील १० दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खरेदीसाठी सूट द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर महापौर अनिता रवींद्र सोनकांबळे, उपमहापौर भगवानराव वाघमारे, सभागृहनेता सय्यद समी सय्यद साहेब जान आदींची नावे आहेत. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली. ईदच्या पूर्वी तीन ते चार दिवस काही काळ सवलत दिली जाईल, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यावेळी सांगितले.