पीक विमा वितरित करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:05+5:302021-01-08T04:52:05+5:30
‘ज्ञानोपासक’मध्ये अभिवादन कार्यक्रम परभणी : येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी ...
‘ज्ञानोपासक’मध्ये अभिवादन कार्यक्रम
परभणी : येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य विजय घोडके, प्रा. अविनाश तळेले, प्रा. डॉ. डी.टी. इबतवार, प्रा. जी.एम. पिसे, प्रा. अर्जित तिडके, प्रा. डॉ. बी.जी. जोंधळे, प्रा. ए.एल. शिंदे, प्रा. एस.के. धोत्रे, प्रा. डी.एच. पवार, दिलीप बोराडे, एस.व्ही. आदरट, वंदना जंगम आदींची उपस्थिती होती. प्रा. वृषभनाथ नालटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वाल्मीक भोसले यांनी आभार मानले.
‘पिवळ्या शिधापत्रिका वितरित करा’
परभणी : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना पिवळ्या शिधापत्रिका वितरित करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी भगवान लंगोटे व परमेश्वर जोंधळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्याचप्रमाणे परभणी शहरात चावडी वाचन न करता मंजूर केलेली अन्नसुरक्षा यादीही रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
‘घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करा’
परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील भीमनगर, रोशनी नगर येथील डीपी रोड रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करून सन २०१२ च्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी नगर विकास मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. डीपी रोड रद्द करण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाने नगरविकास मंत्रालयाकडे सादर केला आहे. मात्र आजपर्यंत त्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे २०१२ च्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांना तांत्रिक मान्यता मिळत नाही. तेव्हा प्रलंबित असलेला डीपी रोड रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करून या भागातील पात्र गोरगरीब लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी परमेश्वर जोंधळे व भगवान लंगोटे यांनी केली आहे.