पुनर्वसनानंतरच अतिक्रमणाचा निर्णय घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:11 AM2021-02-19T04:11:02+5:302021-02-19T04:11:02+5:30

ग्रँड कॉर्नर परिसरात ४० वर्षांपासून व्यावसायिक व्यवसाय करतात. महापालिका नियमाप्रमाणे या व्यावसायिकांकडून भाडेही वसूल करते. मात्र, मागील काही दिवसांपासून ...

Demand for encroachment decision only after rehabilitation | पुनर्वसनानंतरच अतिक्रमणाचा निर्णय घेण्याची मागणी

पुनर्वसनानंतरच अतिक्रमणाचा निर्णय घेण्याची मागणी

Next

ग्रँड कॉर्नर परिसरात ४० वर्षांपासून व्यावसायिक व्यवसाय करतात. महापालिका नियमाप्रमाणे या व्यावसायिकांकडून भाडेही वसूल करते. मात्र, मागील काही दिवसांपासून दुकाने काढून घेण्याचे तोंडी संदेश मनपाच्या वतीने दिले जात आहेत. याच प्रश्नावर व्यावसायिकांनी पालकमंत्री नवाब मलिक यांची भेट घेतली होती. त्यावेळी या दुकानदारांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन होत नाही, तोपर्यंत कोणत्याही भाडेकरू दुकानदारांना जागेतून बाहेर काढू नये, असे स्पष्ट निर्देश मलिक यांनी आयुक्तांना दिले होते.

तेव्हा पुनर्वसनाचे नियोजन होईपर्यंत भाडेकरू दुकानदारांना जागेतून काढू नये, अशी मागणी अय्युब खान आजम खान, अय्युब खान हबीब खान, धोंडिराम जाधव, गुलाम मोहम्मद खान, सय्यद जावेद सय्यद हबीब, बिस्मिल्ला खान बंदे अली खान, युसूफ खान शब्बीर खान, इसाक अली खान आदींनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Demand for encroachment decision only after rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.