रणजित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:13 AM2021-06-21T04:13:57+5:302021-06-21T04:13:57+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २०१८ मध्ये शासनाने रणजित पाटील यांची कुलसचिव म्हणून नियुक्ती केली होती. मात्र रणजित ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २०१८ मध्ये शासनाने रणजित पाटील यांची कुलसचिव म्हणून नियुक्ती केली होती. मात्र रणजित पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करीत बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने स्वतःला वाढीव वेतनश्रेणी लागू केली. या काळात २१ लाख ४ हजार २९५ रुपयांचा अतिरिक्त पगार उचलला. कुलगुरू अशोक ढवण व उपकुलसचिव पी. के. काळे यांच्या संगनमताने हा प्रकार केला आहे, असा आरोप स्वाभिमानी संघटनेने या निवेदनात केला आहे. विशेष म्हणजे, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून बेकायदेशीररित्या रणजित पाटील यांना पत्र पाठवून त्यांच्याकडून जास्तीची दिलेली रक्कम भरून घेतली आहे. तेव्हा या अपहाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, भास्कर खटिंग, दिगंबर पवार, केशव आरमळ आदींनी केली आहे.