जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:21 AM2021-09-24T04:21:29+5:302021-09-24T04:21:29+5:30
शासनाने १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र, अनेक शिक्षक ...
शासनाने १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र, अनेक शिक्षक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असतानाही केवळ शंभर टक्के अनुदानित नसल्याने त्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली. अनुदानाचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित धोरणाचा भाग आहे. त्याचा शिक्षक, कर्मचाऱ्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांचा नियुक्ती दिनांक ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. तेव्हा शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी अभिजित धानोरकर, महेश पाटील, विश्वास दिवाळकर, विलास लोलगे, महेश पामे, शेख वाजेद, शेख रिजवान, नीरज पौळ, सूर्यकांत घुले, मन्नान अन्सारी आदींनी केली आहे.