पाणीटंचाई दूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:17+5:302020-12-29T04:15:17+5:30

: शहरांमधील वाॅर्ड क्रमांक १७ मध्ये अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. होत असलेली ...

Demand for overcoming water scarcity | पाणीटंचाई दूर करण्याची मागणी

पाणीटंचाई दूर करण्याची मागणी

googlenewsNext

: शहरांमधील वाॅर्ड क्रमांक १७ मध्ये अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. होत असलेली भटकंती दूर करावी, अशी मागणी रामप्रसाद कदम यांनी नगरपंचायतीकडे केली आहे. शहरांमध्ये वाॅर्ड क्रमांक १७ मध्ये जवळपास एक हजार लोकसंख्या आहे. या भागात नगरपंचायतद्वारे घेण्यात आलेले एक हातपंप व दोन बोअर नादुरुस्त असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपंचायतद्वारे करण्यात आलेली पाईपलाईन ही बऱ्याच ठिकाणी नादुरुस्त असल्याने आजही या भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना कोसोदूरून पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे या भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती नगरपंचायत प्रशासनाने त्वरित थांबून हातपंप व बोअर दुरुस्ती करून पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशा मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Demand for overcoming water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.