थकीत वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी पूर्णा येथे पालिका कर्मचा-यांचे कामबंद आंदोलनं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 04:38 PM2017-12-22T16:38:53+5:302017-12-22T16:43:59+5:30
मागील ४ महिन्यांपासूनचे थकीत वेतन व डीए च्या फरकातील रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी पूर्णा नगर पालिकेतील कर्मचा-यांनी आज पासून कामबंद आंदोलन सुरू केले.
परभणी : मागील ४ महिन्यांपासूनचे थकीत वेतन व डीए च्या फरकातील रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी पूर्णा नगर पालिकेतील कर्मचा-यांनी आज पासून कामबंद आंदोलन सुरू केले.
पूर्णा पालिकेत वर्ग 3 व वर्ग 4 श्रेणीतील कर्मचाऱ्यांची संख्या 118 आहे. या पैकी वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांचे ४ महिन्याचे तर रोजनदारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 4 महिन्याचे वेतन थकीत आहे. या सोबतच डीए ची रक्कम ही थकीत असून आहे. मागील अनेक दिवसांपासून वेतन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीस तोंड द्यावे लागत आहे.
थकीत वेतन मिळावे यासाठी कर्मचारी वेळोवेळी मुख्याधिका-यां भेटले. परंतु; परंतु पालिका प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने आजपासून या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी मराठवाडा नगरपालिका व महानगर पालिका कर्मचारी युनियनतर्फे नगर पालिका मुख्याधिकारी पंकज पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर संघटनेचे पूर्णा अध्यक्ष उत्तम कांबळे, बेबीताई वारगडे, पार्वतीबाई असोरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
मागण्याचा गांभीर्याने विचार व्हावा
वेतन थकल्याने कर्मचा-यांच्या कुटुंबात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली असून त्यांना उपासमारीची वेळ आली आहे. याचा पालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.
- उत्तम कांबळे, कर्मचारी युनियन अध्यक्ष