मुद्रा योजनेचा प्रचार, प्रसार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:01+5:302021-03-23T04:18:01+5:30

कंत्राटदाराचे ३० लाख रुपये थकले परभणी : १३ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत असे बसपोर्ट उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी ...

Demand for promotion and dissemination of Mudra Yojana | मुद्रा योजनेचा प्रचार, प्रसार करण्याची मागणी

मुद्रा योजनेचा प्रचार, प्रसार करण्याची मागणी

Next

कंत्राटदाराचे ३० लाख रुपये थकले

परभणी : १३ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत असे बसपोर्ट उभारण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असली तरी कंत्राटदाराने आतापर्यंत ६५ लाख रुपयांचे काम केले आहे. मात्र, त्यांना केवळ २५ लाखांचा निधी मिळाल्याने कामात अडथळे निर्माण होत आहेत.

मास्कच्या किमतीत झाली वाढ

परभणी : शहरातील औषधी दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत असली तरी दोन पदरी आणि तीन पदरी मास्क दुप्पटीपेक्षा अधिक दराने विक्री केला जात आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी नागिरकांतून होत आहे.

सिंचन विहिरीवर साडेपाच कोटींचा खर्च

परभणी : सार्वजनिक विहिरी खोदकाम करताना प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. त्यापैकी अनेक तालुक्यांनी कामे हाती घेतली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३०३ गावांत सार्वजनिक विहिरी खोदण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यावर साडेपाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

परभणी : जिल्ह्यातील जिंतूर, मानवत, पूर्णा या तालुक्यांतील क्रीडांगणासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर असला तरीही यातील काही ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, दुसरीकडे सोनपेठ, परभणी, पाथरी येथील क्रीडांगणांसाठी निधी उपलब्ध नाही.

खत दर वाढीने शेतकरी हैराण

परभणी : रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकरी हैराण झाले असून, आगामी खरीप हंगामात पिकांसाठी लागणारे खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

Web Title: Demand for promotion and dissemination of Mudra Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.