स्मशानभूमीसाठी रस्ता देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:59+5:302021-03-23T04:17:59+5:30

शस्त्रक्रियांअभावी रुग्णांची गैरसोय सुरू परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निजामकालीन इमारतीत कार्यरत असलेले मुख्य शस्त्रक्रियागृह मागील १५ दिवसांपासून बंद ...

Demand for a road for a cemetery | स्मशानभूमीसाठी रस्ता देण्याची मागणी

स्मशानभूमीसाठी रस्ता देण्याची मागणी

Next

शस्त्रक्रियांअभावी रुग्णांची गैरसोय सुरू

परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील निजामकालीन इमारतीत कार्यरत असलेले मुख्य शस्त्रक्रियागृह मागील १५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे रुग्ण कल्याण समितीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्यांना रेफर केले जात आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

परभणी : तालुक्यातील सोन्ना, ब्राह्णमगाव, मांडाखळी, बाभळगाव, उजळंबा शिवारात २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी गजानन गमे, मारोती कदम, सुधाकर कोंडरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

शक्ती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा

परभणी : लातूर जिल्ह्यातील कोपरा येथील २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले. या घटनेतील आरोपींवर शक्ती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हा संयोजक माऊली कोपरे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

ज्वारी कापणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी परिसरात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे रबी हंगामातील ज्वारी कापणीसाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. मात्र, मजूर मिळत नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.

२०० मशीन दुरुस्तीअभावी पडून

परभणी : येथील एसटी महामंडळाच्या पाथरी, जिंतूर, गंगाखेड या आगारातील २०० ईटीआय मशीन दुरुस्तीअभावी मुंबई येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाकडे पडून आहेत. त्यामुळे वाहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे विभागीय नियंत्रक कार्यालयाने लक्ष देऊन मशीनची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

दिव्यांगांची परभणीत हेळसांड सुरूच

परभणी : दिव्यांगांना विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी दर बुधवारी रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी परभणीत दिव्यांगांची हेळसांड सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे.

परभणी बसस्थानकात चोऱ्यांमध्ये वाढ

परभणी : येथील बसस्थानकामध्ये अपुरी सीसीटीव्ही यंत्रणा व सुरक्षा रक्षक नसल्याने चोऱ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Demand for a road for a cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.