सेवानिवृत्तांचे प्रस्ताव निकाली काढण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:15 AM2021-01-15T04:15:02+5:302021-01-15T04:15:02+5:30

गंगाखेड नगरपरिषद कार्यालयात लिपिक, वॉलमन, सेवक, सफाई कामगार, शिपाई, वाहनचालक पदावर सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव ...

Demand for settlement of retirement proposals | सेवानिवृत्तांचे प्रस्ताव निकाली काढण्याची मागणी

सेवानिवृत्तांचे प्रस्ताव निकाली काढण्याची मागणी

Next

गंगाखेड नगरपरिषद कार्यालयात लिपिक, वॉलमन, सेवक, सफाई कामगार, शिपाई, वाहनचालक पदावर सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून मंजूर झालेले नाहीत. या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान, महागाई भत्ता आदी लाभ व निवृत्ती वेतन मिळाले नाही. सेवानिवृत्तीनंतर वयोमानानुसार हे कर्मचारी दुर्धर आजाराने पीडित झाल्याने औषधोपचार व अन्य कामांसाठी त्यांना नियमित पैशाची आवश्यकता भासत आहे. निवृत्तीवेतन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करून कुटुंब सेवानिवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्वरित निकाली काढून थकीत महागाई भत्ता, सेवा उपदान व अन्य लाभ तात्काळ अदा करावेत, अशी मागणी उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी केली आहे. निवेदनावर विष्णू खळीकर, कालिदास जोशी, अंबादास कुलकर्णी, दौलत मोरे, म. वा. कुलकर्णी, हाजी शेख गफार, नागोराव सनसाळे, अनंता महाजन, विष्णुकांत वलसेटवार, भीमराव खरात, माणिक साळवे, शंकर गायकवाड, सय्यद निजाम, सु. ग. बोर्डे, कलावतीबाई कोतावर, रामा साळवे, राधाबाई जगतकर, पद्मिनबाई साळवे, गंगाबाई जाधव, नामदेव सावंत, नन्हुबाई जगतकर आदी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Demand for settlement of retirement proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.