मानव विकासची बस सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:13 AM2020-12-27T04:13:06+5:302020-12-27T04:13:06+5:30

पोखर्णी येथील शाळेत इंदेवाडी, कैलासवाडी, भारसवाडा , तामसवाडी , पेगरगव्हाण, ताडपांगरी , आंबेटाकळी आदी गावांतील विद्यार्थिनी ...

Demand to start the bus of human development | मानव विकासची बस सुरू करण्याची मागणी

मानव विकासची बस सुरू करण्याची मागणी

Next

पोखर्णी येथील शाळेत इंदेवाडी, कैलासवाडी, भारसवाडा , तामसवाडी , पेगरगव्हाण, ताडपांगरी , आंबेटाकळी आदी गावांतील विद्यार्थिनी शिक्षणासाठी पोखर्णी येथे येत असतात. २ डिसेंबरपासून दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले असून सोमवारपासून नववीचे व अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची ये-जा करण्यासाठी गैरसोय होत असल्याने पोखर्णी शाळेसाठी ज्या मानव विकासच्या बस सोडल्या जातात त्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी परिसरातील पालकांमधून होत आहे.

हाॅटेल व ढाबाचालकांना अच्छे दिन

देवगावफाटा- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होताच हाॅटेल व ढाब्यावर जेवणावळीसाठी हाऊसफुल्ल गर्दी होत आहे. कोरोनाच्या काळात अनेक दिवस बंद असलेले हाॅटेल व ढाब्यावर निवडणुकीमुळे गर्दी होत असल्याने या व्यावसायिकांना अच्छे दिन आल्याचे चित्र आहे.

वेचणीचे भाव वाढले

देवगांवफाटा- शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असणारे पीक म्हणजे कापूस. खरेतर यावर्षी दोन वेचणीतच कापूस संपला, पण त्यानंतर फुटलेला कापूस वेचणीसाठी मजुरीचा दर हा किलोला १० रुपये लागत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे

तंटामुक्त समित्या कागदावरच

देवगावफाटा- सेलू तालुक्यातील बहुतांश सर्वच गावांत तंटामुक्ती समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र, अनेक गावांत या समितीकडून कोणतेही काम होत नसल्याने या समित्या कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

विनामास्क धोकादायक

देवगावफाटा- कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट होत असल्याने याबाबत नागरिक बिनधास्त होत आहेत. नागरिक सर्वत्र फिरताना मास्कचा वापर करीत नाहीत, हे धोकादायक असून अजून कोरोना संपला नाही. काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे.

Web Title: Demand to start the bus of human development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.