शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:31 AM2021-03-13T04:31:40+5:302021-03-13T04:31:40+5:30

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे, त्यांना नाईलाजास्तव आडतीकडे ...

Demand to stop looting of farmers | शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची मागणी

शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची मागणी

Next

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे, त्यांना नाईलाजास्तव आडतीकडे कापूस विकावा लागत आहे. या आडतीवर शेतकरी कापूस घेऊन गेल्यानंतर त्याचे पट्टीमाप झाल्यानंतर १ क्विंटल कापसामागे १ किलो कटाई धरली जात आहे. त्याशिवाय ज्या चवाळ्यामध्ये किंवा गोणीत शेतकरी कापूस आणतो, त्या चवाळ्याचे वजन सरासरी १ किलो गृहीत धरले जाते. प्रत्यक्षात मात्र त्याचे वजन २०० ते २५० ग्रॅम असते. या प्रकारे शेतकऱ्यांची लूट व्यापाऱ्याच्या मार्फत केली जात आहे. शिवाय तूर, हरभरा व कापूस खरेदीमध्येही एकूण वजनात ९०० ग्रॅमपर्यंतचे असलेले वजन ग्राह्य धरले जात नाही. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांची लूट थांबबावी. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अन्यथा बाजार समितीला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांची निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटू कदम, तालुका प्रमुख नारायण ढगे, बंडू पावडे, लक्ष्मण राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Demand to stop looting of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.