तरुणास २४ व्या वर्षी नैराश्याने ग्रासले; टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 06:07 PM2021-11-17T18:07:11+5:302021-11-17T18:09:51+5:30
काही दिवसांपासून नैराश्यात असलेल्या तरुणाचे टोकाचे पाऊल
पाथरी : शहरातील माळीवाडा येथील २४ वर्षाच्या तरुणाने आयटीआय कॉलेजसमोरील शेतात आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आहे. अनिल दत्तात्रय चिंचाने असे मृत तरुणाचे नाव आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी नैराश्यातून त्याने स्वतःचे जीवन संपवल्याची माहिती आहे.
अनिल दत्तात्रय चिंचाने हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याची माहिती आहे. यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलत आज पहाटे शहरातील आयटीआय कॉलेजच्या समोरील चौधरी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख गौस करीत आहेत.
तरुणांमध्ये वाढत नैराश्य
वयाच्या केवळ २४ व्या वर्षी अनिल चिंचाने याने नैराश्यात आत्महत्या केल्याने तरुणांमधील दिवसेंदिवस खालवत चाललेल्या मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच करिअर, आरोग्य, व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन यावर वेळोवेळी मार्गदर्शन मिळणे यामुळे आवश्यक असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.