मुबलक पाणीसाठा असूनही परभणीकरांना मिळते दहा दिवसांआड पाणी,  मनपाचे नियोजन कोलमडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:27 PM2017-10-25T15:27:32+5:302017-10-25T15:28:52+5:30

अनेक भागात ९ ते १० दिवसांना एक वेळ पाणी येत आहे. त्यामुळे आलेले पाणी एक आठवड्यापर्यंत साठवून ठेवावे लागत आहे.

Despite the abundance of water, Parbhanikar gets ten days of water, the planning of the corporation has collapsed | मुबलक पाणीसाठा असूनही परभणीकरांना मिळते दहा दिवसांआड पाणी,  मनपाचे नियोजन कोलमडलेलेच

मुबलक पाणीसाठा असूनही परभणीकरांना मिळते दहा दिवसांआड पाणी,  मनपाचे नियोजन कोलमडलेलेच

googlenewsNext
ठळक मुद्देपरभणी शहराची लोकसंख्या वाढली असताना महापालिकेची पाणीपुरवठा योजना मात्र ३० वर्षांपूर्वीची जुनी आहे.महानगरपालिकेने पाण्याचे नियोजन करून किमान चार दिवसांआड पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. 

परभणी : यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही परभणी शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न सुटलेल नाही. महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना दहा दिवसांतून एक वेळ पाणी पुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांची पाण्यासाठीची ओढाताण सुरूच आहे. 

परभणी शहराला राहटी येथील बंधा-यातून पाणीपुरवठा केला जातो. हा बंधारा सध्या पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. बंधा-यात मुबलक पाणी असतानाही परभणीकरांना मात्र हे पाणी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची ओरड वाढली आहे. उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होणे साहजिक आहे. परंतु, मुबलक पाऊस झाल्यानंतरही परभणीकरांची पाण्यासाठीची धावपळ थांबलेली नाही. शहरातील विविध प्रभागांमध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पालिकेचे पाणीपुरवठ्याचे नियोजनच विस्कळीत झाले आहे. अनेक भागात ९ ते १० दिवसांना एक वेळ पाणी येत आहे. त्यामुळे आलेले पाणी एक आठवड्यापर्यंत साठवून ठेवावे लागत आहे. त्याच प्रमाणे अनेक वेळा पाण्यासाठी खाजगी बोअरचाही वापर करावा लागत आहे. 

परभणी शहराची लोकसंख्या वाढली असताना महापालिकेची पाणीपुरवठा योजना मात्र ३० वर्षांपूर्वीची जुनी आहे. याच पाणीपुरवठा योजनेवर वाढीव नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. परिणामी वेळेवर पाणीपुरवठा करताना महापालिकेला नाकी नऊ येत आहेत. सद्यस्थितीला राहटी येथील बंधा-यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा असून, जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणामध्ये पिण्यापुरते पाणी उपलब्ध आहे. असे असताना परभणी शहराला मात्र वेळेवर पाणी मिळत नसल्याने मनपाच्या भूमिकेविषयी नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महानगरपालिकेने पाण्याचे नियोजन करून किमान चार दिवसांआड पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. 

नवीन योजनेचे : कामकाज पडले ठप्प
परभणी शहरासाठी युआयडीएसएसएमटी योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे़ परंतु, या योजनेचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडलेले आहे़ कारण नसतानाही या योजनेचे दोन टप्पे करण्यात आले़ येलदरी येथून परभणीपर्यंत जलवाहिनी टाकली, येलदरी येथे उद्भव विहीर, जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे अशी कामे पहिल्या टप्प्यात झाली़ परंतु, ती देखील अपूर्ण आहेत़ दुसºया टप्प्यात शहरात जलवाहिनी अंथरणे, जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे ही कामे केली जाणार आहेत़ निवडणुकीच्या तोंडावर जुन्याच जलवाहिनीला जोडून या योजनेतील नवीन जलवाहिनी टाकण्यात आली़ आता तर हे कामही बंद पडले आहे.
अवैध नळ जोडण्या
शहरात अधिकृत नळ जोडण्याच्या तुलनेत अनाधिकृत नळ जोडण्यांची संख्या अधिक आहे़ त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो़ 

आश्वासन हवेत विरले
काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या़ त्यानंतर मीनाताई वरपूडकर यांची महापौरपदी निवड झाली़ महापौर पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर मीनाताई वरपूडकर यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन दिले होते़ त्यांच्या महापौर पदाला सहा महिन्यांचा कालावधी उलटत आहे़ मात्र अजूनही शहरातील पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही़ 

जलकुंभाचे काम ठप्प
पाणीपुरवठा योजनेंतर्गत येथील राजगोपालचारी उद्यानात जलकुंभ उभारणीचे काम सुरू केले होते़ जलकुंभाचा सांगाडा उभा करण्यात आला आहे़ त्यापुढे हे काम ठप्प पडले आहे़ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातही जलकुंभ उभारले जात आहे़ या जलकुंभाचे कामही धिम्यागतीने सुरू असल्याचे दिसत आहे़ 

वाढीव जलवाहिनीमुळे वाढल्या अडचणी
परभणी शहराला सध्या पाणीपुरवठा करणारी योजना ३० वर्षांपूर्वीची आहे़ शहराच्या लोकसंख्येत दुप्पटीने वाढ झाली असून, या जुन्याच योजनेवर नवीन नळ जोडण्या दिल्या आहेत़ त्यामुळे पाणी पुरवठा करताना अडचणी येतात़ महापालिकेने झोननिहाय पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असले तरी दोन आवर्तनातील अंतर कमी करण्यात मनपाला अपयश आले आहे़ 

निधी मिळूनही होईना उपयोग
परभणी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजनेतून १०२ कोटी रुपयांचा निधी शहरासाठी मंजूर झाला आहे़. परंतु, अमृत योजनेतूनही कामे ठप्प असल्याचे दिसत आहे़. जलकुंभ उभारणीसाठी जागा निश्चित करण्यात आली़. परंतु, जलकुंभाचे कामही अर्धवट अवस्थेत आहे़ त्यामुळे हे काम पूर्ण होणार कधी आणि पाणी मिळणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Despite the abundance of water, Parbhanikar gets ten days of water, the planning of the corporation has collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.