अंकुरलेल्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:13 AM2021-06-24T04:13:56+5:302021-06-24T04:13:56+5:30
सेलू तालुक्यात सद्य:स्थितीत कापूस, सोयाबीन,उडीद,तूर हे अंकुरली असून शिवारही हिरवेगार दिसत आहे. मात्र अंकुरलेल्या या पिकांची हरीण, काळवीट, रोही, ...
सेलू तालुक्यात सद्य:स्थितीत कापूस, सोयाबीन,उडीद,तूर हे अंकुरली असून शिवारही हिरवेगार दिसत आहे. मात्र अंकुरलेल्या या पिकांची हरीण, काळवीट, रोही, रानडुक्कर,वानरे या वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. देवगांवफाटा शिवारात तर रोही, नीलगाय व हरिणांच्या कळपाच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट उभे राहिले आहे. हे वन्यप्राणी समूहाने शेतात फिरत असून सकाळ, संध्याकाळ शेतात कोणी नसताना ते कोवळी पिके फस्त करीत आहेत. या वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
वनविभाग प्रशासन झोपेतच
मागील वर्षात सेलू तालुक्यात शेतकरी मशागतीची कामे करतांना जवळपास १२ शेतकऱ्यांवर रानडुक्कराने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यापैकी चिकलठाणा बु.शिवारातील एका शेतकऱ्यांचा एक पाय कापावा लागला. सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या या शेतकऱ्याला अपंगत्व आले असे असतानाही वनविभाग प्रशासनाकडून याची ना दखल घेतली गेली. यामुळे वनविभाग प्रशासनाची कुंभकर्ण झोप कधी संपते, अशी मार्मिक प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
खरीप पेरणी नंतर अंकुरलेल्या पिकांची हरीण, रोही या वन्यप्राणी नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतात रात्री बराच वेळ थांबून सकाळी लवकर शेतात येणे असा दिनक्रम चालू आहे. विशेषतः हा वन्यप्राणीचा कळप एका शेतकऱ्यांना ऐकत नाही. फटाक्यांचे आवाज करून तर कधी तीन-चार शेतकरी एकत्र येऊन या वन्यप्राण्यांना काढून द्यावे, लागत आहे.
सूर्यकांत होणराव, शेतकरी, देवगांवफाटा