अहिल्याबाईंच्या स्मारकासाठी जागा निश्चित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:23+5:302021-03-07T04:16:23+5:30
परभणी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक व सभागृह उभारण्यासाठी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील मोकळी जागा देण्यात यावी, ...
परभणी : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक व सभागृह उभारण्यासाठी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील मोकळी जागा देण्यात यावी, या मागणीसाठी ५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता खंडोबा मंदिरात धनगर समाज बांधवांची बैठक पार पडली.
शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील नक्षत्रा हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक उभारून, त्यांच्या सभागृहासाठी महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी ५ मार्च रोजी शहरातील खंडोबा मंदिरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स राखत बैठक पार पडली. या बैठकीस प्रभाग क्रमांक ७ मधील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत महानगरपालिकेकडे या मोकळ्या जागेसाठी धनगर समाजाच्या वतीने साकडे घालण्यात येणार असल्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी अहिल्याबाई होळकर सार्वजनिक स्मारक समितीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.