धनगर समाजाकडून युती सरकारच्या आरक्षण वचननाम्याची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:45 PM2018-12-03T13:45:44+5:302018-12-03T13:48:11+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युती सरकारच्या वचननाम्याची होळी करुन आपला निषेध व्यक्त केला.
परभणी : येथील धनगर समाज संघर्ष समिती व समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी ३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युती सरकारच्या वचननाम्याची होळी करुन आपला निषेध व्यक्त केला.
राज्य शासनाला धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतचा टीसचा अहवाल तीन महिन्यापासून प्राप्त झाला; परंतु, याबाबत राज्यशासन कोणतीही भूमिका घेत नसल्यामुळे धनगर समाज संतप्त झाला आहे. त्यामुळे डिसेंबर अखेर राज्य शासनाने धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील धनगर समाज बांधव सोमवारी जिल्हाधिकारी परिसरात सकाळी ११ वाजेच्या सुमारास जमा झाला. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीवेळी धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात युती सरकारच्या जाहीर नाम्यात उल्लेख करण्यात आला होता.या जाहीरनाम्याची धनगर समाज बांधवांच्या वतीने होळी करण्यात आली.
त्यानंतर सरकारविरोधी घोषणा देऊन अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर अॅड.हरिभाऊ शेळके, विठ्ठलराव रबदडे, मारोतराव बनसोडे, सुरेश भूमरे, अनंत बनसोडे, राजेश देवकते, भागवत बाजगीर, विजय घोरपडे, अशोक मुळे, संगिताताई जगाडे, सीताताई बालटकर, बालाजी वैद्य, लक्ष्मण लांडे, अर्जून ढेंबरे, नारायण घनवटे, प्रभाकर जगाडे, गंगाधर डुकरे, विष्णू बोरचाटे, कैलास खनपटे, बाळासाहेब ढोले, भारत आव्हाड, प्रसाद लेंगुळे, रामदास आबूज यांच्यासह धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षºया आहेत. दरम्यान, या आंदोलनास जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.