परभणी जिल्ह्यात धनगर समाज बांधव आरक्षणासाठी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:01 AM2018-08-14T00:01:14+5:302018-08-14T00:02:26+5:30

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी पालम, सेलू व गंगाखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर सोनपेठ, मानवत व पाथरी तहसील कार्यालयावर समाज बांधवांनी मोर्चा काढला. परभणी, जिंतूरमध्ये प्रशासनास निवेदन देण्यात आले आणि पूर्णेत तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालम शहरात कडकडीत बंद

Dhangar society brother in Parbhani district attacked for reservation | परभणी जिल्ह्यात धनगर समाज बांधव आरक्षणासाठी आक्रमक

परभणी जिल्ह्यात धनगर समाज बांधव आरक्षणासाठी आक्रमक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी पालम, सेलू व गंगाखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर सोनपेठ, मानवत व पाथरी तहसील कार्यालयावर समाज बांधवांनी मोर्चा काढला. परभणी, जिंतूरमध्ये प्रशासनास निवेदन देण्यात आले आणि पूर्णेत तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
पालम शहरात कडकडीत बंद
पालम- सोमवारी पालम शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. सकाळपासूनच शहरात बंदचे आवाहन करण्यात आले होते. व्यापाऱ्यांनी त्यास प्रतिसाद देत दिवसभर प्रतिष्ठाने बंद ठेवली. गंगाखेड- लोहा या राज्य रस्त्यावर मुख्य चौकात युवकांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर शनिवार बाजार, नवा मोंढा, परभणी रस्ता, मुख्य चौक, बसस्थानक परिसरमार्गे रॅली काढून तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना माण्यांचे निवेदन देण्यात आले.
सेलू बंदला संमिश्र प्रतिसाद
सोमवारी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजेच्या सुमारास लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून कार्यकर्त्यांचा जमाव घोषणाबाजी करीत क्रांतीचौक, गोविंदबाबा चौक, स्टेशनरोड, बसस्थानक रोड, जिंतूरनाकामार्गे रायगड कॉर्नरवर पोहचला. निदर्शने करुन तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना निवेदन सादर केले. बंद दरम्यान, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविला होता. तालुक्यातील वालूर येथेही धनगर समाज बांधवांनी शेळ्या-मेंढ्या घेऊन मोर्चा काढला. त्यानंतर झिरोफाटा चौरस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
पाथरीत धडकला मोर्चा
पाथरीत आरक्षणासाठी सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. नगर परिषदेसमोरुन मोंढा परिसरातून हा मोर्चा सेलू चौक, बसस्थानकमार्गे तहसीलवर धडकला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर शिवाजी पितळे, उद्धव श्रावणे, राधाकिशन डुकरे, दत्ता मायंदळे, बाबासाहेब रोकडे, पप्पु काळे, बाबासाहेब दुगाणे, डिगंबर ताल्डे, वचिष्ठ कोळेकर, बळीराम नवघरे, नारायण पितळे, शिवाजी ढोले, रमेश सोनटक्के आदींच्या सह्या आहेत.
पूर्णेत धरणे आंदोलन
पूर्णा- धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सोमवारी तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात प्रतिष्ठीत नागरिक, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
चारठाण्यात निवेदन
धनगर समाज आरक्षणासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे यांना देण्यात आले. निवेदनावर नवनाथ झोडपे, सुनील गडदे, दिनकर गोरे, प्रभाकर कुरे, सरपंच नरोटे, कैलास दगडे, आसाराम झोपडे, गजानन गडदे, रामेश्वर गडदे, रामकिशन मस्के आदींच्या स्वाक्षºया आहेत.
परभणीत बैठकीनंतर शांततेत दिले निवेदन
परभणी- धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शहरात समाजबांधवांची बैठक पार पडली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शांततेत निवेदन देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील खंडोबा बाजार भागात समाज बांधवांची बैठक पार पडली. परभणी तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील समाजबांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या योगेश कारके या युवकास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आ.रामराव वडकुते, प्राचार्य शिवाजी दळणर, मारोतराव बनसोडे, सुरेश भूमरे, विठ्ठल रबदडे आदींनी युवकांना मार्गदर्शन केले. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने व शांततेत पाठपुरावा करावयाचा आहे. या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करु नये तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याच प्रमाणे सोशल मीडियावरील पोस्टवरुन कोणतेही पाऊले उचलू नका, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर आ. वडकुते, भूमरे, बनसोडे, रबदडे, डॉ. दळणर, लिंबाजी पुंजारे, गणेशराव मिरासे, विलास लुबाळे, अ‍ॅड. हरिभाऊ शेळके, अनंत बनसोडे, करुणा कुंडगीर, प्रा.तुकाराम साठे, पांडुरंग लोखंडे, अशोक मुळे, सीता बालटकर आदींची नावे आहेत.
सोनपेठमध्ये तहसीलवर मोर्चा
सोनपेठ- धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. अहिल्याबाई होळकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी चौकमार्गे हा मोर्चा तहसीलवर धडकला. तहसीलदार जीवराज डाफकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनील बर्वे, अंगद काकडे, दत्ता पांढरे, सतीश सोन्नर, शाम कसपटे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवतमध्ये मूक मोर्चा
मानवत- धनगर समाज आरक्षण तालुका कृती समितीच्या वतीने १३ आॅगस्ट रोजी मानवत तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पोलीस ठाण्यापासून दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा मोर्चा निघाला. नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मारोतराव गडदे, माणिक मोगरे, शंकर तर्टे, परमेश्वर यमगे, हनुमान पितळे, दत्ता रोडे, कैलास बनगर, दत्ता बनगर, ज्ञानेश्वर पोकरे, रमण खांडेकर, बाबूराव हळनोर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Dhangar society brother in Parbhani district attacked for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.