गंगाखेड येथे धनगर समाज बांधवांचे तहसील कार्यालयासमोर ढोल जागर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 05:03 PM2018-08-27T17:03:04+5:302018-08-27T17:05:03+5:30

धनगर समाज बांधवांच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयासमोर ढोल जागर आंदोलन करण्यात आले.  

Dhol Jagar agitation in front of the Tehsil office of Gangakhed from Dhangar society | गंगाखेड येथे धनगर समाज बांधवांचे तहसील कार्यालयासमोर ढोल जागर आंदोलन

गंगाखेड येथे धनगर समाज बांधवांचे तहसील कार्यालयासमोर ढोल जागर आंदोलन

Next

गंगाखेड (परभणी ) : धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयासमोर ढोल जागर आंदोलन करण्यात आले.  

आंदोलकांनी पारंपरिक वेशात येत कार्यालयासमोर ढोल वाजवत मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाला दोन हजार कोटी रुपये निधी तात्काळ द्यावा, मेंढपाळासाठी प्रत्येक जिल्ह्यात गायरान जमीन राखीव ठेवुन चारा उपलब्ध करून द्यावा, माहेश्वरी मध्यप्रदेश मधील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. 

या निवेदनावर महाराष्ट्र धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी समितीचे भाऊसाहेब कुकडे, जयदेव मिसे, जितेश गोरे, हनुमान देवकते, कैलास रबदडे, शिवाजी बोबडे, सदाशिव कुंडगीर, माधव शेंडगे, सखाराम बोबडे, रुखमाजी लवटे, भगवान बंडगर, माऊली थेंबरे, मगर पोले, संदीप अळनुरे, गजानन देवकते, नारायणराव शेंडगे, स्वप्निल सलगर, दिपक मळगीळ, विजय सोन्नर, रंगनाथ साठे, निळकंठ देवकते, तिरुपती सोन्नर, भागवत लोमटे, यशवंत लवटे, दरलिंग भुसणर, पंकज मुलगीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
 

Web Title: Dhol Jagar agitation in front of the Tehsil office of Gangakhed from Dhangar society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.