इंटरनेटअभावी दस्त नोंद रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:29+5:302020-12-24T04:16:29+5:30

सेलू येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत, बक्षीसपत्र, तारणमुक्त, अदलाबदल पत्र, गहाणखत आदी कामकाज ऑनलाईन पध्दतीने केले जाते. या ...

Diarrhea records stalled due to lack of internet | इंटरनेटअभावी दस्त नोंद रखडल्या

इंटरनेटअभावी दस्त नोंद रखडल्या

Next

सेलू येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत, बक्षीसपत्र, तारणमुक्त, अदलाबदल पत्र, गहाणखत आदी कामकाज ऑनलाईन पध्दतीने केले जाते. या कार्यालयास बीएसएनएलचे इंटरनेट कनेक्शन आहे. मंगळवारपासून कनेक्टीव्हीटी नसल्याने दस्त नोंद करण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. दस्त नोंदणीतून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळातो. परंतु, या कार्यालयाचे इंटरनेट नेहमीच बंद पडत आहे. तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यास विलंब होतो. परिणामी कामकाजाचा खोळंबा होतो. अनेकजण खरेदी, विक्री करणारे व्यक्ती बाहेरगावाहून येतात. इंटरनेटअभावी नागरिकांची गैरसोय झाली. लाॅकडाऊनमुळे तीन महिने कार्यालय बंद होते. त्यामुळे खरेदी ,विक्री व्यवहार रखडले होते. जून महिन्यापासून पुन्हा कार्यालयाचे कामकाज सुरू झाले. त्यातच शासनाने सप्टेंबर महिन्यापासून नगरपालिका हद्दीतील मुद्रांक शुल्कात ३ आणि गावठाण हद्दीतील दस्तनोंद करण्यासाठी २ टक्के सवलत दिल्याने मागील तीन महिन्यांपासून खरेदी विक्रीच्या व्यवहारात वाढ झाली आहे. दरम्यान, मंगळवारपासून इंटरनेटअभावी कामकाज ठप्प झाले होते.

केबल यंत्रणा झाली जुनाट

सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयास बीएसएनएलचे इंटरनेट कनेक्शन आहे. परंतु, बीएसएनएलची २० ते २५ वर्षापूर्वीची केबल यंत्रणा आहे. केबल जुनाट झाल्याने वारंवार इंटरनेटची समस्या निर्माण होत आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजेपासून या कार्यालयाची इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आली आहे.

- मिलिंद वाटुरे, अभियंता, बीएसएनएल कार्यालय सेलू

लाॅकडाऊन नंतर १४०९ दस्त नोंद

लाॅकडाऊन नंतर जूनपासून सेलू येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात १४०९ दस्त नोंद झाल्या आहेत. सद्यस्थितीत मुद्रांक शुल्कात सवलत असल्याने दररोज २० ते ३० खरेदी, विक्री व्यवहार होत आहेत. यामध्ये जून - १६०, जुलै - १२१, ऑगस्ट-१९०, सप्टेंबर- ३५२, ऑक्टोबर- ३३८, नोव्हेंबर-२५८ दस्त नोंद झाल्या आहेत.

Web Title: Diarrhea records stalled due to lack of internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.