स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:56+5:302020-12-30T04:22:56+5:30

मोकळ्या जागेचा गैरवापर गंगाखेड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या दोन घरांची पडझड झाली आहे. दारे, खिडक्या काढून ...

Difficulty in not having an independent cemetery | स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने अडचण

स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने अडचण

Next

मोकळ्या जागेचा गैरवापर

गंगाखेड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या दोन घरांची पडझड झाली आहे. दारे, खिडक्या काढून नेली आहेत. या पडक्या घरात इतर ठिकाणचे नागरिक दारू पिवून धुम्रपान करीत असतात. जनतेच्या सुरक्षिततेसाठी ही पडकी घरे पाडून जागा मोकळी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

वालुर येथे उमेदवारांचे जागरण

वालुर : कागदांची जुळवा-जुळव करून ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी रात्र् - रात्र जागून काढावी लागत आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरणारी साईड सावकाश चालत असल्याने दिवसभरात केवळ पाच ते सात अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे उमेदवारांची धावपळ होत आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर असल्याने इच्छुक उमेदवार रात्री एक ते दोन वाजेपर्यंत जागरण करीत आहेत. वालुर ही १७ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. यात इच्छुक उमेदवारांची संख्याही मोठी आहे.

उमेदवारांची आरटीपीसीआर तपासणी

सोनपेठ : येथील तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येत आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उमेदवारांकडून गावात सभा, कॉर्नर सभा, प्रत्यक्ष भेटीगाठीद्वारे मतदारांशी संपर्क साधण्यात येत असतो. त्यामुळे कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षितता म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यात येत असलेल्या नामनिर्देशन केंद्रावर इच्छुक उमेदवार व प्रतिनिधी यांची आरटीपीसीआर तपासणी करणे आवश्यक आहे.

Web Title: Difficulty in not having an independent cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.